ठाणे वागळे वाहतूक विभाग भ्रष्टाचार प्रकरण : वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची टाळाटाळ, भ्रष्ट कर्मचाऱ्याला बचावण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र स्टेट ब्यूरो चीफ शुभम मिश्रा
ठाणे, २६ जून २०२६ – ठाणे पासपोर्ट कार्यालयासमोर चिमटा लावून ₹३०० रिश्वत घेणाऱ्या भ्रष्ट ट्राफिक कर्मचाऱ्यांविरुद्ध पुरावा असूनही वागळे ट्राफिक पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब भ्रष्टाचार्यांना वाचवण्यात व्यस्त असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुभम मिश्रा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आज वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांनी पीएसआय शिरसाट आणि एपीआय साहेबांना आपल्या केबिनमध्ये बोलावले. त्याचवेळी अर्जदार शुभम मिश्रा यांनाही केबिनमध्ये बोलावण्यात आले. केबिनमध्ये बसल्यावर PSI साहेब अर्जदारासमोर माफी मागू लागले. ते म्हणाले,

“माफ करा, चुकी झाली… यापुढे असे होणार नाही. साहेब, मी पैसे घेतले तुमच्याकडून…”
PSI साहेब स्वतःच आपली चूक कबूल करत माफी मागत असताना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मात्र संपूर्ण प्रकरणावर टाळाटाळ करत होते. भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट दिसून आले.
शुभम मिश्रा म्हणाले,
“पुरावा, ट्रांझॅक्शन आयडी, व्हिडिओ रेकॉर्डिंग — एवढा भक्कम पुरावा असूनही वरिष्ठ पोलीस निरीक्षक भ्रष्ट कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. हे अत्यंत गंभीर आणि निंदनीय आहे. एका बाजूला PSI माफी मागतोय, दुसऱ्या बाजूला वरिष्ठ अधिकारी त्यांना संरक्षण देत आहेत. ही पोलिस यंत्रणेची विश्वासार्हता संपवणारी बाब आहे.”

Loading

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1WIN: как казахстанский игрок может открыть дверь к удаче Когда в Казахстане

Loading

Search