महाराष्ट्र स्टेट ब्युरो चीफ
ठाणे, ११ जून २०२६ – ठाणे पासपोर्ट कार्यालयासमोर चिमटा लावून रिश्वत घेण्याच्या प्रकरणात आता वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कृष्णा कुलकर्णी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तक्रारदाराला जबाब घेण्याच्या नावाखाली ६ ते ८ तास केबिनमध्ये बसवून ठेवणे, मानसिक दबाव टाकणे आणि भ्रष्ट कर्मचाऱ्याला वाचवण्यासाठी “जाऊ द्या” असे म्हणणे, या प्रकारामुळे ठाणे पोलिस यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.महाराष्ट्र स्टेट ब्यूरो चीफ शुभम यांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा कुलकर्णी यांनी केबिनमध्ये बसवून अर्जदाराला खालील शब्दांत सांगितले :
“एका त्याला माफ करा, जाऊ द्या… त्याचे आयुष्य खराब होईल. तो रिटायरमेंटला आला आहे म्हणून मी बोलतोय. मी कोणासाठी बोलत नाही… दुसरा कोणी असता तर मी कंट्रोल रूममध्ये जमा केला असता, पण आता हे रिटायर होणार आहे म्हणून बोलतोय.”
PSI साहेब स्वतः “मी पैसे घेतले, चुकी झाली, यापुढे होणार नाही” अशी माफी मागत असतानाही, वरिष्ठ निरीक्षक कृष्णा कुलकर्णी यांनी भ्रष्ट कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याऐवजी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट दिसून आले.तक्रारदाराचे आरोप म्हणाले, “जबाब घेण्याच्या नावाखाली ६-८ तास केबिनमध्ये बसवून मानसिक छळ करणे, ‘माइंड वॉश’ करण्याचा प्रयत्न करणे आणि भ्रष्ट कर्मचाऱ्याला रिटायरमेंटच्या निमित्ताने वाचवणे — ही पद्धत आहे का? पाकीट देऊन तक्रार मागे घ्यायला सांगितले जेव्हा मी नाकारले, तेव्हा आता ही नवी स्टाइल सुरू झाली आहे. वागळे ट्राफिक शाखेतील किती कर्मचारी भ्रष्टाचारात लिप्त आहेत, हे लवकरच जनतेसमोर येईल.”
![]()





