Tuesday, 5 November, 2024

सामाजिक कार्यकर्ते “अण्णा पंडित” यांची सोशल मीडिया वर केलेली बदनामी भोवली… कमाल शेख व त्याच्या साथीदारांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल….

क्राइम रिपोर्टर शुभम मिश्रा:

कल्याण:(प्रतिनिधी) सामाजिक क्षेत्रात नावलौकिक असलेले ज्येष्ठ समाजसेवक महेंद्र तथा अण्णा पंडीत यांची फेसबुक या सामाजिक माध्यमावर अपमानजनक व बदनामीकारक पोस्ट प्रसारित केल्या प्रकरणी कमाल शेख व त्याच्या इतर साथीदारांवर ॲट्रोसिटी व बीएन‌एस कायद्यांतर्गत महात्मा फुले चौक पोलिस ठाणे, कल्याण मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदलापूर पूर्व येथील संजय नगर झोपडपट्टीतील काही शोषित पिडीत यांना कायदेशीर मदत व मार्गदर्शन करून त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या आरोपींवर जून २०२४ मध्ये बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात फसवणूक व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यांमध्ये कमाल शेख हा सुद्धा एक आरोपी असून सध्या तो फरार आहे.
सदर दाखल गुन्ह्यामध्ये अण्णा पंडित यांनी फिर्यादी संतोष साबळे यांचे मनात विष कालवून त्यांना खोटा ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. अशा आशयाची बातमी विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करणारे संपादक व वृत्तांकन करणारे पत्रकार यांनी जाणीवपूर्वक अण्णा पंडित यांची वृत्तपत्रातून बदनामी करून ॲट्रॉसिटी कायद्याबद्दल समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता जाणीवपूर्वक छापुन आणलेल्या खोट्या बातम्यांमुळे अण्णा पंडित यांची सामाजिक प्रतिष्ठा मलीन करण्याचा प्रयत्न संबंधित संपादक व पत्रकार यांनी केलेला आहे. सदर बातमींचे कात्रण संकलित करून फेसबुक या सामाजिक माध्यमांवर सुपारी बाज आणि एका रात्रीत करोडपती होण्याचे स्वप्न ठेवणारे … संधीसाधू असे आक्षेपार्ह शब्दप्रयोग करून अण्णा पंडीत यांचे लौकिकास बाधा निर्माण करणारी पोस्ट व वृत्तपत्रात छापून आलेल्या बदनामीकारक व खोट्या बातम्यांचे कात्रणं संकलित करून फेसबुक वर प्रसिद्ध व प्रसारीत केले होते. यामुळे जेष्ठ समाजसेवक आणि अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे प्रदेश सरचिटणीस तसेच श्रमिक (मु) पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष अण्णासाहेब पंडित यांची समाजात नाहक बदनामी झाली असून त्यांची सामाजिक प्रतिष्ठा जाणीवपूर्वक मलीन केल्याप्रकरणी कमाल शेख व त्याचे सहकारी अरुण ठोंबरे, रामेश्वर गवई, आदित्य भानुशाली, कैलास साबळे, सुरेश जगताप,विजय सिंग आणि प्रमोद हरपुडे यांचेवर ॲट्रॉसिटी व बीएनएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त, सुर्यकांत जगदाळे हे करीत असुन ॲट्रोसीटी गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक न केल्यास पोलिस प्रशासना विरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती अण्णा पंडीत यांनी पत्रकारांशी वार्तालाप करतांना दिली आहे.

 6,676 Total Views

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search